जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या, जिल्हास्तरीय सावित्रीची लेक, रोटरीचा नेशन बिल्डर अवॉर्ड, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त लेखिका, कवयित्री सौ.सुजाता पुरी यांची काव्यरचना
सूर्य अस्ताला गेल्यावर
सजलेली सांज येते…
उन्ह उतरणीची सावली
प्रेमाची आठवण देते..
नभातले रंग सांगतात
मनात दाटलेले क्षण…
पाखरांच्या परत येण्याने
ढवळून जाते मन..
नसतो पुरेसा उजेड
नसतो पूर्ण अंधार
या घटिकेचे नाव काय
शोधते मन आधार…
हूरहूर वाटते सांजवेळी
उगाच बसता निवांत..
सजा म्हणावी की भेट
विचारतो मज एकांत…
गायवेळ अथवा मायवेळ
असते नेहमीं कातरवेळ…
म्हणूनच लेकरांच्या आठवणींचा
असतो आईजवळ मेळ…
भल्या बुऱ्या क्षणांचा
मनात करीत रवंथ..
कातरवेळ वाचून दाखवते
कितीतरी महान ग्रंथ…
सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337