सावंतवाडी
नुकत्याच दिल्ली आणि भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे मध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीच्या सहा नेमबाजांची महाराष्ट्र व गोवा संघामधून निवड झाली होती. दरम्यान आता सर्व खेळाडूंनी भारतीय निवड चाचणी संघामध्ये आपली पात्रता सिद्ध केली.
महाराष्ट्र संघामधून १० मिटर एअर पिस्तूल प्रकारात युथ गटामध्ये कु साहिष दिगंबर तळणकर (दोडामार्ग) याने ६०० पैकी ५५० गुण, कु आयुष दत्तप्रसाद पाटणकर ( सावंतवाडी) याने ५४३ गुण तर कु स्वानंद प्रशांत सावंत (सावंतवाडी) याने ५४० गुण तसेच १० मिटर पीप साईट एअर रायफल प्रकारात कु संजना अमोल बिडये( सावंतवाडी) हिने ५९४.७ गुण मिळवत चांगली कामगिरी केली.त्याच प्रमाणे गोवा राज्य संघामधून एअर पिस्तूल प्रकार श्री. अतुल लक्ष्मण नाखरे(सावंतवाडी) यांनी ६०० पैकी ५६२ गुण नोदविले तर एअर रायफल प्रकारात कु. यश विवेक पवार (गोवा) याने ६०२.८ गुणांची नोंद करून उत्कृष्ट कामगिरी केली वरील सर्व खेळाडूंनी भारतीय निवड चाचणी संघामध्ये आपली पात्रता सिद्ध केली.
एअर रायफल प्रकारात निवड झालेले खेळाडू हे ७ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्याने भोपाळ येथे होणाऱ्या निवड चाचणी मध्ये सहभागी होणार आहेत तर १३ जानेवारी ते २५ जानेवारी मध्ये एअर पिस्तूल प्रकारातील खेळाडू दिल्ली येथे निवड चाचणी साठी सहभागी होतील.वरील सर्व खेळाडू प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.विक्रम भांगले यांचे मौलीक मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.