कणकवली :
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वय वर्ष १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेला आज शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी कामत यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पी. डी.कामत म्हणाले की,आज प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.कोरोनाची लस घेतल्याशिवाय आपले आरोग्य सुरक्षित राहणार नाही म्हणून शासनाच्या लसीकरण मोहीमेस सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या वेळी उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू यांनीही विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.”कोरोणाच्या काळात दोन वर्षात मोठ्या प्रमाणात शिक्षण कार्य थांबले होते.हा धोका पुन्हा वाढला असल्यामुळे त्यामुळे महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी लस घेतलीच पाहिजे.”असे प्रतिपादन विजयकुमार वळंजू यांनी केले.
याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, आरोग्य विभागाच्या कर्मचारी श्रीमती नयना मुसळे, प्रा.के.जी.जाधवर,प्रा.जी. डी. पाटील,श्रीमती मनीषा कदम, श्री बुचडे उपस्थित होते.