मालवण :
मीरा क्लिनफ्युअल्स् लि. अंतर्गत शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कं.लि. मालवण कडुन दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील ओवळीये,वराड व काळसे गावातील शेतकरी सदस्यांना 4G बुलेट सुपर नेपीयर गवताच्या ठोंबांचे वितरण करण्यात आले. सदर बियाणे तामिळनाडू येथील कावेरी फार्मस् या नोंदणीक्रुत कंपनीतुन मागविण्यात आले आहे.यावेळी शिवस्वप्न कंपनी चे संचालक सदस्य, गावप्रतिनीधी,Channel Partners व शेतकरी सदस्य उपस्थित होते.
मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या या बायो CNG प्रकल्पांतर्गत नेपीयर गवताच्या लागवडीतुन तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार आहे.
या माध्यमातुन तालुक्यातील जास्तीत जास्त पडिक जमीन लागवडीखाली आणण्याचे कंपनीचे ध्येय्य असुन याचा लाभ शेतकऱ्यांनी करुन घेण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.