सुमारे पन्नास हजाराचे नुकसान; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
बांदा
येथील निमजगा परिसरातील भरवस्तीत उभी करून ठेवलेली आलिशान कार अज्ञाताने फोडली आहे. हा प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेत कारच्या समोरीरील व मागच्या काचेसह सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. संबंधित कार तेथील रहिवासी राजेश माने यांच्या मालकीची होती. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलिस ठाण्यात आज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमजगा जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत श्री.माने यांनी आपल्या मालकिची (एम.एच.१२ एफ.के.८२७४) फोर्ड फियेस्टा ही आलीशान कार उभी करुन ठेवली होती. यावेळी अज्ञाताने कारच्या दर्शनी व मागील भागाची काच फोडुन मोठे नूकसान केले. मात्र त्याने हा प्रकार नेमका कशासाठी केला हे समजू शकले नाही. श्री.माने सकाळी गाडी काढण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेत संबंधित कारचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. माने यांनी सांगितले. तसेच नूकसान करण्याच्या हेतुनेच काचा तोडल्या असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अज्ञाता विरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जवळच सि.सि.टीव्ही.कॅमेरा असल्याने पोलीसाना अज्ञाताच्या मुसक्या आवळण्यात लवकरच यश येणार आहे. दरम्यान, दोन दिवसात अज्ञाताच्या मुसक्या न आवळल्यास माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना संलग्न आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना बांदा पोलीसांची भेट घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.