You are currently viewing सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार आज जाहीर

सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार आज जाहीर

सावंतवाडी

वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार अमोल टेंबकर, कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार हेमंत मराठे, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार हरिश्चंद्र पवार, स्व. त्रि. अ ऊर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तम नाईक, जीवनगौरव पुरस्कार डॉ. स्वार पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन धारणकर, छायाचित्रकार तथा ज्येष्ठ पत्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार उत्कृष्ट छायाचित्रकार बाळा खडपकर यांना जाहीर करण्यात आला.
पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष प्रविण मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकारिता पदवीधर समन्वयक राजेश मोंडकर, समिती सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी पुरस्कार जाहीर केले.
६ जानेवारीला सकाळी ११ वाजता माजगाव येथील डायमंड हॉल येथे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुक्ष्मी, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रीय पत्रकार परिषद अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार समिती जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
तालुका पत्रकार समितीची सभा आज पत्रकार कक्षात समिती अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते. या बैठकीत पत्रकार समितीच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी खजिनदार रामचंद्र कुडाळकर मो. नं. ९७६३७१७७६१ यांच्याकडे नावे नोंद करावे असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रविण मांजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा