You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवली तालुक्यातील युवा उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी लागली आहे.निलेश गोवेकर यांचे समाजकार्य चांगले आहे.आणि त्यांना भंडारी समाजाबद्दल आवड,प्रेम,त्यांची समाजबांधवांसाठी एक तळमळ असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.आज सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गची मासिक सभा रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.जिल्हा महासंघाची सभा कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली.या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी विस्तारादरम्यात कणकवली येथील रहिवासी युवा उद्दोजक श्री.निलेश गोवेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी सर्व सदस्यांच्या एकमताने निवड करण्यात आली.महासंघाच्या बैठकित सर्वांच्या एकमताने निलेश गोवेकर यांची जिल्हाभंडारी संघाचे स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.या निवडी नंतर अध्यक्ष यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण वायंगणकर ,सेक्रेटरी विकास वैद्य ,मोहन गवंडे ,विलास आसोलकर ,सीताराम खडपकर ,उल्हास हळदणकर ,समील जळवी ,राजू गवंडे , श्रीकांत वेंगुर्लेकर ,दिलिप पेडणेकर ,सुनील नाईक ,अनंत कांबळी ,मनोहर पालयेकर ,निलेश गोवेकर ,तुकाराम करंगुटकर ,लक्ष्मीकांत मुंडीये उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा