You are currently viewing १ ऑक्टोंबर पासून टोल दरवाढ…

१ ऑक्टोंबर पासून टोल दरवाढ…

मुंबई प्रतिनिधी:

 

१ ऑक्टोबरपासून मुंबईतील वाहन प्रवेश  महाग होणार आहे. मुंबईत सरकारी वाहने वगळता इतर वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून ५  ते २५ रुपयांपर्यंत वाढीव टोल आत्ता भरावा लागणार आहे. वाढलेले नवे दर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असतील.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते असते. त्यानुसार प्रायव्हेट वाहने  आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता ४० रुपये इतकी होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मासिक पास आता १४०० रुपयांवरुन १५०० रुपये इतका होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा