You are currently viewing कणकवली – कोल्हापुर एसटी फेरी सुरू करण्याची मागणी…!

कणकवली – कोल्हापुर एसटी फेरी सुरू करण्याची मागणी…!

कणकवली

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यावर दोन महिने उलटून गेले. यामुळे एसटी प्रवासावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. संपात सहभागी झालेले काही चालक-वाहक कामावर रुजू झाले असल्याने जिल्हा अंतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.

मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार – उदीम हा कोल्हापूर हून चालत असल्याने कोल्हापूर लाये – जा करण्याकरिता एसटीची सुविधा उपलब्ध नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. तरी सिंधुदुर्ग – कोल्हापूर नियमित एसटी फेरी सुरू करावी अशी मागणी कणकवलीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे. खाजगी वाहनातून कोल्हापूरला ये-जा करण्यासाठी सर्व सामान्य जनतेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सिंधुदुर्गातून कोल्हापूर ला सकाळी व संध्याकाळी अशा दोन एसटी फेर्‍या सुरू करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, निसार शेख, सादिक कुडाळकर, परेश परूळेकर, नितीन तावडे, विनायक मेस्त्री, सायली परुळेकर आदी उपस्थित होते. यासंदर्भात विभाग नियंत्रक यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा