जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना
रोजच्या रोज दिवस बदलतो
आंनदाने जगायला शिक
वर्ष तर बदलत जाईल गड्या
सगळ काही होईल ठीक
मास बदलतो ऋतु बदलतो
हाच दिवस रात्री चा लंपडाव
सुर्य चंद्र ग्रह नक्षत्रे तेच नभी
काल चक्राचा असे अंनत ठराव
कधी वसंत कधी ग्रीष्म ऋतु हे
श्रावण झोके कधी तळपते उन्ह
सुखदुःखाची झळ बसे किनारी
नियतीचा असतो आदेश वरुन
कधी लहान कधीतरी महान
असतो दिवस कटु गोड छान
कर्तव्य निष्टेला प्राधान्य देता
ध्येय असावे मग आशावान
तुमच्या आमच्या जन मताने
कित्येक वर्षे येतील सरतील
मानवतेची पुजा करता
खरा हैप्पी न्यू ईयर म्हणतील
प्रो डॉ जी आर( प्रवीण )जोशी
ज्येष्ठ कवि लेखक
अंकली बेलगांव
कॉपी राइट 31 डिसेम्बर 2021
।। सर्वे सुखिनः संतु ।।