पाच जणांचा सायकल प्रवास; किनारे स्वच्छ ठेवण्यास पुढाकार…
मालवण
कोकणाला निसर्गाची देणगी मिळाली असून सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. मात्र पर्यटकांचा ओढा गोव्याला अधिक असतो. नाशिक, ठाणे, लातूर येथील पाचजणांनी एकत्र येऊन कोकणात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी तसेच किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबई ते गोवा सायकल प्रवास सुरू केला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सागरी किनारी राबवून कोकणातील पर्यटन वाढीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिक येथील यामिनी खैरनार व कुणाल खैरनार यांच्यासह ठाण्यातील डॉ. रुपेश जयराम, ध्रुव जयराम तसेच लातूरमधील डॉ. भगवान केंद्रे सहभागी झाले आहेत. सध्या हे पथक मालवण येथे दाखल झाले आहे.