कुरुंदवाड येथील ज्येष्ठ लेखक कवी प्रा.दिलीप सुतार यांची नवं वर्षाच्या स्वागतासाठी लिहिलेली अप्रतिम काव्यरचना
ध्यास घेऊनी चांगूलपणाचा
नित्य आपुले कर्म करा
ओंजळ भरूनी मैत्रफुलांची
नववर्षाचे स्वागत करा…
सांगतो आहे मित्रानो
नववर्षाचा पहाटवारा…
वागवा स्रियांना सन्मानाने
शिकवा मुलीना अभिमानाने…
तळपू द्या त्यानांही स्वतेजाने
होऊन सावित्रीसम ध्रुवतारा…
सांगतो आहे बंधूनो
नववर्षाचा पहाटवारा…
विसरून गोष्टी स्व:स्वार्थाच्या
जाती धर्म अन् गटातटाच्या
देशहिताचे काम करा…
सांगतो आहे तुम्हाला
नववर्षाचा पहाटवारा…
ऊठू लागल्या सागरांत आता
प्रलयाच्या उत्तुंग त्या लाटा
थोपवून समस्त त्या प्रदूषणाला
वाचवा आपली प्रिय वसुंधरा…
सांगतो आहे तुम्हाला
नववर्षाचा पहाटवारा…
आठवून इतिहास बलिदानाचा
स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा
लावून बाजी स्वप्राणांची
भारतमातेचे रक्षण करा…
सांगतो आहे तुम्हाला
नववर्षाचा पहाटवारा…
वंदून प्रिय भारतीय संविधानाला
ध्वज मानवतेचा उंच धरा…
‘सत्यमेव जयते’ ची आपुली
थोर भारतीय परंपरा…
सांगतो आहे विश्वाला
नववर्षाचा पहाटवारा…!!!
प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं9552916501