You are currently viewing वेंगुर्ला शिक्षक कला मंचचा स्तुत्य उपक्रम

वेंगुर्ला शिक्षक कला मंचचा स्तुत्य उपक्रम

सिंधुदुर्गनगरी

कोरोना या जागतिक महामारीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक बालकं अनाथ झाली. अशाच कोरोना मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षक सरसावले आहेत. या शिक्षकांनी स्थापन केलेल्या कला मंचच्या वतीने 30 डिसेंबर 2021 रोजी कोरोना महामारीने अनाथ झालेल्या मुलांसाठी आर्थिक मदत करावी या हेतूने भौमासुर वध अर्थात नरक चतुर्दशी महिमा या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.

            या नाटकाच्या प्रयोगातून जमा होणारा निधी अनाथ मुलांना वितरीत करण्यात येणार आहे. या निधी वितरणाचा सोहळा शनिवार दि. 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वा. साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित केला आहे.

            या महामारीची झळ जगातल्या प्रत्येक देशाला बसली आहे. या महामारीच्या काळात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचे प्रकार घडताना आपण पाहिले आहेत. या महामारीच्या काळात अनाथ झालेल्या बालकांविषयी तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर शासनाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या बालकांचे हक्क राखणे आणि प्रश्न सोडवण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. या कोरोना महामारीच्या काळात माणूस एकमेकांपासून लांब पळत असल्याचे दिसत असतानाच वेंगुर्ला येथील शिक्षकांनी उभारलेला हा उपक्रम खरच स्तुत्य म्हणावा लागेल. कोरोनामुळे अनाथ झालेल्या या बालकांच्या मदतीला अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्वांनी पुढे येऊन या शिक्षकांचा आदर्श सर्वांनीच घेण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा