You are currently viewing भूमी अभिलेखच्या वेळ काढू कामकाजावर शेतकरी नाराज…

भूमी अभिलेखच्या वेळ काढू कामकाजावर शेतकरी नाराज…

मनसे ने घेराव घालत विचारला जाब…

सावंतवाडी

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांची नाराजी असल्याचे शहर मनसेच्या निदर्शनास येताच आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रियदा साकोरे यांची भेट घेत चर्चा केली यावेळी कार्यलयाला आवश्‍यकतेपेक्षा निम्मा स्टाफ असल्याने करण पुढे करत यापुढे लोकांची कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले

यावेळी मनसेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, अभय देसाई, लक्ष्मीकांत हरमलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील एका शेतकऱ्याने ऑक्टोबर महिन्यात जमिनीचा नकाशा मिळण्याबाबत अर्ज केला होता मात्र अर्ज करून तीन महिने उलटूनही त्याला भूमिअभिलेख कार्यालयाकडून नकाशा मिळाला नसल्याने त्याने आपली कैफियत मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर मांडली यावेळी त्या शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली या कारभाराबाबत तात्काळ दखल घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रियदा साकोरे यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला त्यांच्याशी बराच काळ चर्चा केली मात्र कार्यलयाला अपुरा स्टाफ असल्याचे करण त्यांनी पुढे करत अपुऱ्या स्टाफ बाबत आपला पाढाच वाचला यापुढे लोकांची कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा