कामाचे मूल्यांकन न करता ठेकेदाराला अदा केली रक्कम….
दोडामार्ग
झरेबांबर ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात येणाऱ्या संतगोरा कुंभार समाज मंदिर बांधकामवर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे मासिक सभेत उघड झाले आहे.
झरेबांबर ग्रामपंचायत मार्फत संतगोरा कुंभार समजा मंदिर बांधकाम करण्यासाठी पंचायत समिती शेष फंडातून ५० हजार रुपये मंजूर झाले होते. ते बांधकाम करण्यासाठी सदर कामाचा कोणताही ठराव घेतला नाही त्या कामाचे मूल्यांकन केले नाही व शासनाच्या नियमांचे पालन न करता ग्रामसेवक याने संबंधित ठेकेदाराला नियमात ३०% रक्कम द्यावी मात्र तसे न करता ग्रामसेवकाने ५०% रक्कम ठेकेदाराला दिली. हे समोर येताच ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता जाधव, भूषण सांवत यांनी आक्षेप घेत ग्रामसेवकाची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. या विषयावर समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनीही जिल्हा परिषदेत आवाज उठवला व सदर कामाची चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलताना सांगितले की आमचा कामाला कोणताही विरोध नाही विकास कामात आमचा मुळीच अडथळा नाही अजून आम्ही आमच्या गावासाठी भरघोस निधी देऊ मात्र अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचारी यांचे आम्ही खपून घेणार नाही. त्याच्यावर कारवाई होई पर्यंत गप्प बसणार नाही असे जाधव बोलताना म्हणाले.