सिंधुदुर्ग :
आज जिल्ह्यातील अनेक समस्यांचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आलो. जिल्ह्यातील ज्या विभूतींनी जिल्हा बँक उभारली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा बँक तळहातासारखी जपली. त्याचा मी साक्षीदार आहे. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते आणि ते कधीही आणू नये. बँक ही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आहे. मुलांना कमी व्याजदराने कर्ज दिले. कोकणात आंबा, काजू या व्यतिरिक्त शेतकरी कर्ज घेत नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बँक ही ठरवलेल्या नियमांप्रमाणे चालली पाहिजे.
५ लाखापर्यत कर्ज आता शून्य व्याजदराने कर्ज मिळवून दिली. राजकारण करायची जागा एकीकडे तर सहकार एकीकडे. त्यामुळे हा पायंडा सर्वांनी जपला पाहिजे. खासदार, आमदार होणं सोपं मात्र बँक लढविणे कठीण. कोणत्याही आमिषाला मतदारांनी बळी पडू नका. असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी घडले तिथल्या बँका बंद पडल्या. विरोधकांची संस्था चालवण्याची पद्धत कशी आहे याचा विचार करा.
निवडणुकीत गाफील राहू नका. तुमच्या बँकेची बाजू योग्य असेल तर तुम्ही घाबरू नका, आम्ही सर्वजण तिथे असू असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना दिला. कोकणी माणूस विचार करून मतदान करतो हा इतिहास आहे आणि जिल्हा बँक निवडणुकीत हाच इतिहास पाहायला मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार समृद्धी पॅनेलच्या संवाद सभेत व्यक्त केला.