कुडाळ :
कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सर्वधर्म समभावाची नेहमी शिकवण दिली जाते.सर्व धर्मीयांचे सण-उत्सव नेहमीच आनंदाने साजरे केले जातात . प्रत्येक धर्मियांच्या सणाची वैशिष्ट्यपूर्णता विविध उपक्रमातून, प्रदर्शनातून फेस्टिवल मधून जपली जाते ,जोपासली जाते आणि त्याच आनंदाने सेलिब्रेशनही केलं जाते.याचाच एक भाग म्हणून ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस उत्सव सुद्धा चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्या स्वरा गावडे , समन्वयक डॉ.श्रेया देसाई व इतर अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या आनंदाने साजरा केला गेला. सांताक्लॉजची लक्षवेधी उपस्थिती असलेल्या या फेस्टीवलमध्ये नाताळ सेलिब्रेशन केक कापणे,भेटवस्तू देणें ,फूड फेस्टिवल, ग्रीटिंग कार्ड मेकिंग कॉम्पिटिशन चा समावेश होता. हा सण नाच गाण्यासहित व नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहात साजरा करण्यात आला.