You are currently viewing कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन उद्या सावंतवाडीत

कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन उद्या सावंतवाडीत

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग निमंत्रित कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन उद्या दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता सावंतवाडीतील काझीशहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित केले आहे. कोरोनाच्या अति प्रतिकूल काळानंतर सिंधुदुर्गचे “भाकरी आणि फुल” या मधू मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकाच्या नावाने कुडाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय पाहिल्या कवी संमेलनानंतर सावंतवाडी मध्ये होणारे आद्यकवी केशवसुतांच्या “एक तुतारी दे मजसी आणुनी” या क्रांतिकारी गाजलेल्या कवितेतील “तुतारी” नावाने दुसरे कवी संमेलन होत आहे.
सावंतवाडीत होणारे तुतारी कविसंमेलन कवी विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असून उद्घाटक सावंतवाडीतील उद्योजक तथा उदयोन्मुख कवी दीपक पटेकर असून प्रमुख उपस्थिती सावंतवाडीचे मावळते नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, तसेच स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका उषा परब आहेत. कोमसाप सिंधुदुर्ग निमंत्रित कोमसाप सावंतवाडी शाखा आयोजित तुतारी कवी संमेलनास सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा कार्यवाह भरत गावडे, तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, तालुका कार्यवाह प्रा. प्रतिभा चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी कोमसाप तर्फे देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा