भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर गुरूजी यांच्या हस्ते पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या विषयी वीचार मांडताना बागलकर गुरूजी म्हणाले की पं.दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले विचार भाजपा साठी मार्गदर्शक आहेत .पं. दिनदयाळजींनी मांडलेले ” एकात्म मानव दर्शन ” भाजपाने १९८५ साली आपली विचारधारा म्हणून स्वीकारली . जनतेने देशाचे भवितव्य घडवीण्याची जबाबदारी भाजपा वर सोपवली आहे . अशा वेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे विचार पक्षासाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत .
यावेळी वेंगुर्ले शहरातील विनायक नारायण जोशी , सुरेश लक्ष्मण घाडी , गोपाळ सावंत , मधुकर मेस्त्री , अनंत भिकाजी राऊत , अनिल दत्ताराम नाईक या सहा व्रुद्ध व दिव्यांगासाठी आधार काठी भेट देण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , सोमनाथ टोमके , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटनीस जयंत मोंडकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , व्रुंदा गवंडळकर , युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष दशरथ गडेकर , रविंद्र शिरसाठ , तुळस सरपंच शंकर घारे , संदीप पाटील , राहुल मोर्डेकर , निलय नाईक , शरद मेस्त्री , महेंद्र घाडी , संतोष साळगांवकर , प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते .