जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना
कधीतरी तू सांगशील
हो, मी चुकले..
माझ्याच वचनात
होते मी फसले
भावनांच्या भरात
दिली होती ती वचने
कोण जाणे भावनांत
यालाच म्हणतात का अडकणे?
कधीतरी तू सांगशील..
शब्द फिरवले नाहीत मी
शब्दांना कुठे येते फिरता?
मी सहज बोलून गेले
शब्दांना येते का मन जाणता?
खोट्या नव्हत्या भावना
नाही केला देखावा
खरंच याला म्हणतात का कावा?
कधीतरी तू सांगशील
आयुष्य होतं माझं
गुलाबासारखं बहरलेलं
सुगंधीत मोगऱ्यासारखं
केसाकेसांत मोहरलेलं
गुंतता दोऱ्यात ते
गजरा होऊन सजलेलं
असंच असतं का जीवन मंतरलेलं?
कधीतरी तू सांगशील..
“तू जपलंस मला कायमच..
जसं अंतरीचं भावफुल
केली नव्हतीस तू चुकूनही भूल”
आठवतील तुला ते दिवस
येईल तुझ्या आठवांना पूर..
अंतरीच्या भावफुला… उमजेल तेव्हाच
हेच असतं का राहणं हृदयापासून दूर…?
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६