You are currently viewing देवगड नगरपंचायत मधील उर्वरित चार प्रभागासाठी आरक्षण सोडत…

देवगड नगरपंचायत मधील उर्वरित चार प्रभागासाठी आरक्षण सोडत…

4 व 5 प्रभाग मध्ये सर्व साधारण महिला तर 7 व 8 प्रभाग मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित…

देवगड

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पुर्वीच्या आरक्षणाप्रमाणे नामाप्र साठी चार प्रभाग आरक्षित असलेल्या ठिकाणी सर्वोच्च्‍ न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या चारही नामाप्र च्या प्रभागामध्ये सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी प्रभाग आरक्षित करण्याच्या आदेशाप्रमाणे देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 4,5,7,8 या प्रभागांमधील दोन सर्वसाधारण महिला व दोन सर्वसाधारण जागांसाठी देवगड तहसिलदार कार्याल्यामध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 4 व 5 सर्व साधारण महिलांसाठीव 7,8 सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.यामुळे उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर यांना आरक्षणाचा फटका तर माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक योगेश चांदोस्कर यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नामाप्र साठी आरक्षित असलेल्या चार प्रभागांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्व प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुरुवारी उपविभागीय अधिकारी सुधिर पाटील व मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्या उपस्थितीमध्ये हि सोडत तहसिलदार कार्यालयामध्ये काढण्यात आली. यावेळी राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये एकुण 17 प्रभाग असून यामधील 13 प्रभागांची निवडणुक 21 डिसेंबर रोजी पार पडली आहे. तर उर्वरित चार प्रभाग हे पुर्वीच्या आरक्षाप्रमाणे नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते .मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नामाप्र साठी आरक्षित झालेल्या चारही प्रभाग सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी चक्रव्यवहार नुसार करण्यात यावे असा आदेश दिला होता. याप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 व 5 मध्ये पुर्नरआरक्षण सोडतीमध्ये हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत.

यामुळे विदयमान उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर यांना आरक्षणाचा फटका तर प्रभाग क्रमांक 7 व 8 हे सर्वसाधारण राहिल्यामुळे माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक योगेश चांदोस्कर यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे.सदर चारही प्रभागामधील निवडणुक 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. तर सर्व प्रभागांची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा