सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता –https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज महाडिबीटी पोर्टल मंगळवार 14 डिंसेबर 2021 पासून सुरू झालेले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दि.31 जानेवारी 2022 पर्यंत भरण्यासाठी सुचित करावे. तसेच सन 2020-21 मधील नुतनीकरणाचे अर्ज व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची अंतिम दि. 31 जानेवारी 2022 आहे.
जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालय स्तरा वरील अर्ज विहीत वेळेत या कार्यालयास वर्ग झाले नाहीत व संबंधित मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी,असे आवाहन समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.