*युवासेना तालुकाप्रमुख आणि संस्थेचे सभासद योगेश धुरी यांची माहिती*
सर्वोदय पतसंस्थेचे लेखापरीक्षण व्हावे, अशी तक्रार संस्थेचे संचालक दादा बेळणेकर यांनी केली होती.
प्रकाश मोर्येनी आपल्या अध्यक्ष पदाचा गैरवापर केला, त्यामुळे भविष्यात संस्था अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती आहे, असा आरोप करण्यात आला होता.
प्रकाश मोर्ये हे जिल्हा बँक च्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आणि आपणच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होणार असा प्रचार करत आहेत.
ज्या प्रकाश मोर्येना साधी एक पतसंस्था सांभाळायला जमत नाही आणि ते जिल्हा बँक ची निवडणूक लढवता आहेत.
एका पतसंस्थेत त्यांचे एवढे पराक्रम मग जिल्हा बँकेत काय दिवे लावले असतील याची कल्पना येते. अशी टीकाही योगेश धूरी यांनी केली.
दुसऱ्यांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा स्वतः ची माणस ज्यांना आपण उमेदवारी दिली त्यांचे पण पराक्रम बघा.
स्वतःची घर भरणारे जिल्हा बँकेचे उमेदवार प्रकाश मोर्ये आणि त्यांचे नेते दुसऱ्यांवर टीका करता आहेत.
ज्यांच्या अध्यक्ष म्हणून कार्यकाळाची लेखापरीक्षण चौकशी होतेय या वरून त्यांच्या कार्याची आपल्याला कल्पना येईल.
अश्या माणसांना आपण मतदान करणार का ? आपण सर्व जिल्हा बँकेचे सुज्ञ मतदार असल्या प्रवृत्तीच्या माणसांना मदत करणार का ? असा सवाल योगेश धुरी यांनी केला आहे.