You are currently viewing वैभववाडीत ८१.८६ टक्के मतदान…

वैभववाडीत ८१.८६ टक्के मतदान…

वैभववाडी

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या १३ प्रभागासाठी ८१.८६ टक्के मतदान झाले आहे.१३.प्रभागातील एकूण .१३८४ मतदारांपैकी ११३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यात ५६९ महिला तर ५६४ स्ञी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.सर्वाता जास्त मतदान मतदान प्रभाग क्र.४ मध्ये ९५.२४ टक्के मतदान झाले आहे.तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र.२ मध्ये ६३.८६ टक्के झाले आहे. १३ जागांसाठी ३७.उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे.

माञ निकालासाठी १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागून राहाणार आहे. वाभवे वैभववाडी ही राज्यातील सर्वात लहान नगरपंचायत असून या नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक पंचवार्षिक निवडणूक होत आहे.ही निवडणूक भाजप शिवसेनेकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.तर काॕग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे ही आपले नशिब अजमावत आहेत.तर तीन अपक्ष उमेदवारही ताकदीनिशी मैदानात उतरल्यामुळे एकूणच निवडणूक चुरशीची ठरली आहे. सकाळी ७.३० वा.पासून कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली.शहरात १३.प्रभागासाठी १३ मतदान केंद्रावर मतदान झाले.मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर तसेच संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रभाग क्र.१ मध्ये एकूण १३० मतदारांपैकी ९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात ४७ स्ञीया तर ५२ पुरुषांचा सहभाग होता.या प्रभागात एकूण ७६.१५ टक्के मतदान झाले आहे. प्रभाग क्र.२ मध्ये ६३ टक्के मतदान झाले असून ८३ मतदारांपैकी २५ स्ञीयां तर २८ पुरुषांनी मतदान केले आहे. प्रभाग क्र.४. या प्रभागात ९५.२४ टक्के मतदान झाले आहे.एकूण ८७ मतदारापैकी ४० स्ञीयां व ४० पुरुष असे एकूण ८० मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्र.६ या प्रभागात ७८.३६ टक्के मतदान झाले आहे.एकूण १३४ मतदारापैकी १०५ मतदारांनी मतदान केले.यात ५० स्ञीया तर ५५ पुरुषांचा सहभाग आहे. प्रभाग क्र ७ या प्रभागात ७८.८९ टक्के मतदान झाले आहे.एकूण ९० मतदारांपैकी ३५ स्ञीया तर ३६ पुरुषांनी मतदान केले . प्रभाग क्र,८ या प्रभागात ९१.१५ टक्के मतदान झाले आहे,एकूण ११३ मतरांपैकी १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.यात ५४ स्ञीयां तर ४९ पुरुष मतदार आहेत. प्रभाग क्र,९ या प्रभागात ७९.०५ टक्के मतदान झाले आहे.एकूण १०५ पैकी ८३ मतदारांनी मतदान केले.यात ४१ स्ञीया तर ४२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्र.१० या प्रभागात ९० टक्के मतदान झाले आहे.एकूण १२० मतदारांपैकी १०८ मतदारांनी मतदान केले आहे: यात ६२ स्ञीया तर ४६ पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. प्रभाग क्र.११ या प्रभागात ६६.६७ टक्के मतदान झाले आहे.एकूण १३८ मतदारापैकी ९२ मतदारांनी मतदान केले.यात ५० स्ञीया व ४२ पुरुष मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्र.१२ या प्रभागात ९१.५८ टक्के मतदान झाले आहे.एकूण ९५ मतदारांपैकी ४२ स्ञी तर ४५ पुरुष मतदार आहेत. प्रभाग क्र:-१३ या प्रभागात ८९.४१ टक्के मतदान झाले आहे.एकूण ८५ मतदारांपैकी ७६ मतदारांनी मतदान केले आहे.यात ३६ स्ञीया तर ४० पुरुष मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्र:१४ या प्रभागात ८५.९६ टक्के मतदान झाले आहे.एकूण ११४.मतदारांपैकी ९८ मतदारांनी यात ४९ स्ञी व ४९ पुरुष मतदार आहेत. प्रभाग क्र.१७ या प्रभागात ८६.६७ टक्के मतदान झाले आहे.एकूण ९० मतदारांपैकी ७८ मतदारांनी मतदान केले आहे.यात ३८ स्ञीयां व ४० पुरुष आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा