राणे यांनी सत्य उघड केल्याने सामान्य जनतेतुन स्वागत
राजापूर
तालुक्यातील नाणार व गोवळ, बारसू एमआयडीसी परिसरातील जमिन घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांचा कसा सहभाग आहे, रिफायनरी प्रकल्पपरिसरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच मावस भावाने एका कंपनीच्या माध्यमातुन कशी जागा खरेदी केली आहे, हे भाजपाचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी रत्नागिरी पत्रकार परिषदेत पुराव्यासह उघड केल्याने तालुक्यात शिवसेना पदाधिकारी आणि लँन्डमाफियांचे धाबे दणाणले आहेत. तर निलेश राणे यांनी सत्य परिस्थिती जनतसमोर आणून बाहेरून विरोध आणि आतुन पाठींबा अशी दुटप्पी भुमिका घेणाऱ्या शिवसेनेला पुरते उघडे केल्याने सर्वसामान्य जनतेतुन स्वागत होत आहे.
तालुक्यात नाणार व परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन खरेदी विक्री व्यवहारात पुर्वीपासूनच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसा सहभाग असल्याचे पुढे आले होते. बुधवारी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा युवा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मावस भाऊ असलेल्या निशात सुभाष देशमुख यांनी सुगी डेव्हलपर्स कंपनीच्या माध्यमातुन १४०० एकर जमिन खरेदी केलेली असून शिवसेनाच हा प्रकल्प आणणार असे नमुद केले होते. तर शिवसेना विभाग प्रमुख कमलाकर कदम यांनी एका जागेवर कुळ म्हणून नाव नोंद करून जागा मालकाची फसवणूक केल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.
तर बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेला एमआयडीसी प्रकल्प हा शिवसेनेनेच आणलेला असून या ठिकाणीही शिवसेनेच्या राजापूरातील काही युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य गरिब शेतकऱ्यांच्या जमिन खरेदी विक्री प्रकरणात त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यात खरेदी विक्री व्यवहारासाठी बंद असलेल्या सातबारा उताऱ्यावरिल जमिनीची खरेदी विक्री परप्रांतियांना केल्याचे नावा निशी व पुराव्यासह निलेश राणे यांनी उघड केले आहे. तर याच परिसरात रूची डेव्हलपर्स या कंपनीने ९०० एकर जागा खरेदी केलेली असून यातही शिवसेंना पदाधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
निलेश राणे पत्रकार परिषदेत पुराव्यासह या जमिन घोटाळयात कोणाचे आणि कशा प्रकारे हात बरबटलेले आहेत हे उघड केल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. राजापूरात या प्रकरणाची एकच चर्चा सध्या सुरू असून यामुळे आता शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यांसह लॅन्डमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र निलेश राणे यांच्या या भुमिकेचे सर्वसामान्यांतुन स्वागत होत आहे. अनेकांनी निलेश राणे यांनी सत्य बाहेर काढले व वस्तुस्थिती जनतेसमोर आणली हे बरं झालं अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशा प्रकारे जमिन खरेदी विक्री व्यवहार करून गब्बर झालेल्या शिवसेनेतील या दलालांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. शिवसेनेत पदे उपभोगताना या पदांचा अशा गैरप्रकारसाठी वापर करणाऱ्यांविरोधात आता शिवसेना काय भुमिका घेणार आहे की नाही? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.