You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना कोविड महामारीत वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करा….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना कोविड महामारीत वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करा….

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी आ. प्रमोद जठार यांची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे मागणी

मुंबई

चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी आ. प्रमोद जठार यांनी पहाणी केली होती. पहाणी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये काही त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आणि आज दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना कोविड महामारीत वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करा,अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे केली. श्री यड्रावकर हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसल्याने श्री जठार यांनी यड्रावकर यांच्याशी फोन वर संपर्क साधून चर्चा केली. यड्रावकर यांनी मुंबईत आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानूसार श्री जठार यांनी मुंबईत आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांची भेट घेतली व त्यांच्याकडे निवेदन सोपविले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात अनेक समस्या आहेत. त्यामूळे मृतांची संख्या ६९ वर पोहचली आहे. ८० टक्के रिक्तपदे आहेत, त्यामुळे रुग्णांच्या सेवेवर परिणाम झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर हे २० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु आहे . उर्वरित ८० टक्के डॉक्टर, कर्मचारी भरतीचे काय नियोजन केले आहे ? याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाची प्रत सुधारणेत यावी. रुग्णांना जेवणासोबत एक लिटर साफ स्वच्छ
पिण्याच्या पाण्याची (बाँटलची ) व्यवस्था करणेत यावी, कारण रुग्णांच्या पाण्याची गैरसोय आहे. रुग्णांना ‘क’ जीवनसत्व वाढविण्यासाठी
जेवणसोबत संत्रे किवा मोसंबी देणे आवश्यक आहे. फळांची पूर्तता करणेत यावी , रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या जागेची पाहाणी केली असता अत्यंत गालिच्छ असल्याचे आढळले आहे. तेथील स्वच्छता व सुधारणा करणेची व्यवस्था असल्याने त्याचे नियोजन करण्यात यावे, रुग्णवाहिकेची दुरुस्तीची कामे करण्यात यावी. १०८ रुग्णवाहिका पायलटना ५० लाख रुपयाचे विमा कवच देण्यात यावे. १०८ रुग्णवाहिका पायलटाचा पगार वेळेवर देण्यात यावा, रेमेडेसिविअर या औषधाचा साठा जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे. त्याबाबत योग्य ती व्यवस्था तसेच रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असल्याने ६ वॉटर डिस्पेसरची आवशक्ता आहे. अशा प्रकारच्या जिल्हा रुग्णालयातील त्रुटी आहेत, त्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली. त्यानंतर वरील मागण्यांवर आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी स्वतः सिंधुदुर्गात येऊन आढावा घेणार
असल्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक याच्याशी चर्चा केली आहे असल्याची माहीती जठार यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा