जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना
तू आहेस लावण्याचे रान
अन् मी धुक्याची चादर
आपल्या ओढीने झाला
रेशमी प्रणयाचा पाझर..
गुलाबी थंडीच्या पहाटे
छेडताना देहावरचे शहारे
तुझ्या श्वासाचे संगीत
जणू प्रणय स्पंदाळणारे..
नाही गरज शेकोटीची
तू जवळ असल्यावर
उबदार मिठीत तुझ्या
पडतो थंडीचा विसर..
थंडीत मी चहाचा
काढतच नाही विषय
रात्रही तरुण करणारा
आपला रेशमी प्रणय..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई