सावंतवाडी
जागतिक रेबीज दिनानिमित्त सावंतवाडी शहरा मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी प्रकाश रामचंद्र वाडकर (मोबाईल नंबर-९६०७५९९३८६) या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रेबीज या आजारापासून वाचण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या विषयाला अनुसरून आपल्या घरीच रांगोळी काढून दिलेल्या नंबर वर त्याचा फोटो काढून पाठवावे असे त्यांनी सांगितले आहे. स्पर्धकांनी काढलेली रांगोळी रविवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या नंबर वर पाठवायचे आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३०० रूपये आणि प्रशस्तीपत्रक ; तर द्वितीय पारितोषिक २०० रुपये आणि प्रशस्तीपत्रक ठेवण्यात आले आहे. तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. अशी माहिती मिशन रेबीज (संस्था, महाराष्ट्र) चे ऐजुकेशन ऑफिसर प्रकाश वाडकर यांनी दिली आहे.