You are currently viewing कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यावर चाकूहल्ला

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यावर चाकूहल्ला

कणकवली

करंजे गावचे माजी सरपंच व मजूर फेडरेशनचे संचालक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना पाठीमागून इनोवा कारने धडक देत ते खाली पडल्यावर त्यांच्यावर चाकूसारख्या टोकदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी 11.10 च्या सुमारास कणकवलीत घडली. कणकवली रेल्वे स्टेशन रस्त्यावरील कनकनगर येथे डॉक्टर नागवेकर यांच्या सिटीस्कॅन सेंटर समोर घडलेल्या या घटनेत परब यांच्या छातीवर उजव्या बाजूने धारदार हत्याराचा वार झाला असून यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासहित पोलीस पथकाने रुग्णालयात धाव घेतली. तसेच नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, हरकुळचे माजी सरपंच आनंद ठाकूर, दामू सावंत, राजू शेट्ये, सचिन सावंत, मंगेश सावंत, बेनी डिसोजा व इतरांनीही रुग्णालयात धाव घेतली होती. श्री परब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्री. परब यांनी दिलेल्या माहितीनुसार राखाडी रंगाच्या ईनोवा गाडीने आपल्याला मागून धडक दिली. आपण खाली पडल्यावर गाडीतून उतरलेल्या दोघांनी आपल्यावर वार केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गाडीला पाठीमागची नंबर प्लेट नसून सदर ची गाडी कनेडीच्या दिशेने रवाना झाल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा