You are currently viewing शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे, एस. टी. आमच्या हक्काची सर्व सामान्य जनतेची…

शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे, एस. टी. आमच्या हक्काची सर्व सामान्य जनतेची…

शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे, एस. टी. आमच्या हक्काची सर्व सामान्य जनतेची…

घोषणांनी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, एस. टी. कर्मचारी मोर्चा घेऊन तहसीलदार कार्यालयावर..

सावंतवाडी

गेले कित्येक दिवस एस. टी. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अश्यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले. सावंतवाडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली एस. टी. स्थानक सावंतवाडी ते तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.

शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे, ”एस. टी. आमच्या हक्काची सर्व सामान्य जनतेची” अश्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणादूण सोडला. या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, एस. टी. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापेक्षा मोर्च्याचे अधिक उग्र रूप दिसेल असा इशारा यावेळी मंगेश तळवणेकर यांनी दिला.

सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी या मोर्च्याला पाठींबा दर्शविला. यावेळी मनसे परिवहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर, महेश गवंडे, आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, वेगवेगळ्या गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा