प्रभागाच्या नगरसेविका सौ.भारती मोरे, सौ.वाडकर व बाबू कुडतरकर यांनी केले होते विशेष प्रयत्न
सावंतवाडीतील विविध प्रभागातील विकासकामांचे भूमिपूजन येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. नगरोत्थान निधीतून होऊ घातलेली श्री स्वामी समर्थ मठासमोरील नाला व पाटणकर घरा समोरील गटाराचे बांधकाम व फरशी बसविणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मठासमोरील नाला बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संजू परब यांनी श्रीफळ वाढवून केले तर पाटणकर घरासमोरील गटार कामाचे भूमिपूजन श्री. रामचंद्र पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जवळपास आठ महिने गरड भागातील नागरिकांनी नगरसेविका सौ भारती मोरे व सौ वाडकर, बाबू कुडतरकर यांच्या सहकार्याने नगरोत्थान निधीतून दोन्ही विकास कामे व्हावीत यासाठी पाठपुरावा केला होता अशी माहिती गरड भागातील नागरिकांकडून देण्यात आली. प्रभागातील विकासकामे मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भूमिपूजन प्रसंगी नगरसेविका सौ भारती मोरे, नगरसेविका सौ वाडकर, नगरसेवक परिमल नाईक, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल सावंत, रामचंद्र पाटणकर, उमेश पाटणकर, सुजित कोरगावकर, सौ.पारकर मॅडम, श्री.पारकर सर, प्रशांत पाटणकर, योगेश पाटणकर, सौ पल्लवी पाटणकर, सौ उषा पाटणकर आदी नागरिक तसेच कॉन्ट्रॅक्टर अशोक पेडणेकर, नगरपालिकेचे कुडपकर उपस्थित होते.