You are currently viewing सुरक्षेत आहे तुमची भलाई – तीच आहे जीवनाची कमाई

सुरक्षेत आहे तुमची भलाई – तीच आहे जीवनाची कमाई

खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे एड्स जनजागृती निमित्त जरा जपूनचा… संदेश

खारेपाटण :

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे जागतिक एड्स सप्ताह निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे एड्स सप्ताहाचे औचित्य साधून एड्स जनजागृती पर पथनाट्य, रॅली, भित्ती पत्रक प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, एच.आय.व्ही.टेस्टिंग शिबीर इत्यादी विविध उपक्रम राबवूण हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्या कडून मिळालेल्या निर्देशानुसार रेड रिबन कल्बची स्थापना करण्यात आली.

सुरक्षेत आहे तुमची भलाई – तीच आहे जीवनाची कमाई अशा विविध घोषणांच्या गजरात महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या जनजागृती रॅलीची सुरुवात होऊन ही रॅली खारेपाटण बाजारपेठ, घोडेपात्र, खारेपाटण उपबसस्थानक या मार्गावरून खारेपाटण महाविद्यालयच्या परिसरात संपन्न झाली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. वसीम सय्यद, प्रा. डॉ.वंदना व्हटकर-शिंदे, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या सौ. ॠतूजाताई कर्ले, प्रा. डाॅ. वंदना शिंदे-व्हटकर, प्रा. शोभा देसाई, प्रा.प्रकाश शिंदे, प्रा.तानाजी गोदडे, प्रा.सागर इंदप, प्रा.रुची तेली, प्रा.मंगल परब, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आय. सी. टी. सी. समुपदेशक मा. श्री. सुशील परब, प्रयोग शाळा तंत्रज्ञ मा. श्रीमती किर्ती-पवार या जनजागृती पथनाट्य व रॅलीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी प्रतिनिधी कु. अंकिता सुर्वे व कु.सिध्देश सावंत आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी महत्त्वाची भुमिका बजावली.

कु. ममता कदम, कु. साक्षी भालेकर, कु. सौरभ पंडकलकर, कु. आदिती भालेकर, कु. साक्षी हर्याण, कु.मयुर मोरे, कु. चेतन मांजरेकर, कु. गुरुनाथ भोसले, कु. मयूरी पवार, कु. सुजय पेडणेकर, कु. जयश्री इंगळे, कु. प्राजक्ता गाडे, भक्ती पिसे, कु. तन्वी शिंदे, कु. विनय सावंत यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

या पथनाटयाचे निर्देशन राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवक प्रतिनिधी कु. ममता कदम व गुरुनाथ भोसले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा