You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण

सावंतवाडीतील उद्योजक दीपक माजगावकर उद्घाटक तर अध्यक्षस्थानी आमदार नितेश राणे

फोंडाघाट

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीची ही शाळा १९५२ साली माधव बुक सेंटरच्या माडीवर सुरू झाली होती. कै. बाबासाहेब नाडकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून त्यावेळच्या परिस्थिती नुसार शाळेची वास्तू उभारली त्याला आज ७० वर्षे झाली. शिक्षणरूपी गंगा फोंडाघाट पंचक्रोशीत घराघरात पोचविण्याचे भगीरथ कार्य ही संस्था गेली ७० वर्षे करीत आहे. अशा या ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचे लोकार्पण शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. विद्यानगर फोंडाघाट येथे सावंतवाडीचे उद्योजक श्री.दीपक माजगावकर व सौ.मानसी माजगावकर यांच्या शुभहस्ते होत असून अध्यक्षस्थानी कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ.अनिल सावंत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ व कोल्हापूर येथील वास्तुविशारद श्री सदानंद सबनिस साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पाचवी ते पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून आर्ट्स व कॉमर्स शाखेतून उच्च शिक्षण दिले जाते. तब्बल २४०० विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने २०२० मध्ये एसएससी परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या १५ विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे कै.बाबासाहेब नाडकर्णी फाउंडर मेंबर यांच्या स्मरणार्थ सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री.अजित नाडकर्णी, माजी खजिनदार यांच्याकडून जाहीर करण्यात आले. १९५२ साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला पाहताना आनंद होत असून भविष्यात याहूनही विस्तार व्हावा अशा शुभेच्छा नवीन संचालक मंडळाला माजी खजिनदार श्री.अजित नाडकर्णी यांनी दिल्या आहेत. शाळेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे अशी विनंती फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आलेली आहे.

लोकार्पण सोहळा

शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१
सकाळी ठीक १०.०० वा.

मुलांचे विविध गुणदर्शन व गुणगौरव सोहळा सायंकाळी ठीक ०६.०० वा.

प्रतिक्रिया व्यक्त करा