जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य सागर बाणदार यांचा लेख
खरंतर माणसाला माणूस फार काळ
मानसिक आधाराचा विसावा देवू शकत नाही… म्हणून ,तो सरतेशेवटी मनाला शांततेचा ,समाधानाचा अनुभव देणा-या माणसांच्या कमी वर्दळीचा ,
निवांत जागेचा निवारा शोधत असतो…तसा ,त्याला निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या ,मंदिराच्या शांत व पवित्र जागेचा पर्याय अधिक पसंदीचा वाटतो…या ठिकाणच्या
स्वच्छ हवेच्या ,पवित्र वातावरणातील
काही घटकेच्या सहवासात देखील त्याच्या मानसिक ताणतणावाची तीव्रता कमी होत असावी…खरंतर ,हीच निसर्गाच्या अदभूत शक्तीची ,मंदिरातील पवित्र वातावरणाचा चमत्कार असतो ,म्हणून तर त्याला समर्पित भावनेने नमस्कार करताना आव्हानांना ,संकटांशी दोन हात करण्याचं मनाला अधिक बळ मिळतं…अशी ही निसर्गाची ,श्रध्दा असलेली ठिकाणे ही मग् तिर्थस्थानेच बनून जातात… ही मनातल्या अंधश्रद्धा दूर करत डोळस श्रध्देनं परिपूर्ण जगणं शिकवत राहतात… म्हणून ,कदाचित माणूस ,झाड अन् मंदिर यांचंही एक अतूट नातं असावं…जिथं निरपेक्ष भावनेनं सगळं काही भेटत राहतं ,तसं त्यांच्या ठिकाणी भेदांपलिकडे जावून
नतमस्तक होणं आपोआप घडतं …!
आज सकाळी इचलकरंजीत जुना चंदूर रोड परिसरात दुर्गामाता मंदिर परिसरात मोबाईलमध्ये टिपलेला हा सुंदर नजारा…!
– सागर बाणदार