कणकवली
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये कणकवली नगरपंचायत अंतर्गत “ब्रँड ॲम्बेसिडर” म्हणून कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलवलकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांनी अभिनंदन केले आहे.
कणकवली शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत विविध उपक्रम राबविणे व जनसामान्यांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती करून कणकवली शहर देशात, राज्यात अव्वल स्थानी आणण्याकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व ब्रँड ॲम्बेसिडर दिपक बेलवलकर यांनी सांगितले. या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, प्रतिश खैरे, सतीश कांबळे, मनोज धुमाळे, अमोल भोगले आदी उपस्थित होते