समविचारी लोकांची बैठक
जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणार निवेदन
गावागावात गोवा बनावटीची भेसळयुक्त दारू आणि मटक्याच्या अवैद्य व्यवसायामुळे तरुण पिढी नोकरी व्यवसायाच्या मागे न लागता दारू आणि मटक्याच्या धंद्यात झटपट पैसा कामविण्याच्या नादात आयुष्य बरबाद करतात. ऐन तारुण्यात कामधंदा सोडून व्यसनी बनतात, त्यामुळे भविष्यात पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
न्हावेली, ता.सावंतवाडी गावातील समविचारी लोकांनी एकत्र येत गावात बैठक घेतली व गावात आजूबाजूला असलेल्या दारू व मटका व्यवसायावर बंदी घालण्याची तयारी केली. गावाच्या बैठकीत गावातील अवैद्य दारू, मटका व्यवसाय बंद करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
न्हावेली गावातील समविचारी लोकांनी एकत्र येत दारू मटका अशा अवैद्य व्यवसायांवर बंदी आणण्यासाठी बैठक घेऊन विचार करण्यात आला तसाच इतर गावातील लोकांनी देखील विचार केल्यास जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायांवर टाच येईलच परंतु जिल्ह्यातील नवी पिढी बरबादीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त होईल यात शंकाच नाही.