You are currently viewing खाऊन मात्र करा साजरा टाकून नको

खाऊन मात्र करा साजरा टाकून नको

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लेख: अहमद मुंडे

जुन्या लोकांची एक म्हण आपणांस कायम आठवते. जुनी माणसं म्हणायची # अन्न हे पूर्ण ब्रह्म.आहे. गतकाळात लोकवस्ती कमी होती. त्यामुळे लोकांच्या अशा अपेक्षा कमी होत्या. सर्वांना सकस व पौष्टिक आहार दोन वेळचे जेवण मिळावे ही आपली दैनंदिन गरज आहे. भारतात पावसाची अनियमितता. आधुनिक शेती अभाव. आधुनिक शेती औजारे अभाव. पाणी सिंचन व्यवस्था नाही. यामुळे आपणांस स्वातंत्र्य मिळाल्यावर आपणांस अन्नधान्य तुटवडयाला तोंड द्यावे लागले. परदेशातून अन्न धान्य आयात करून आपण आपली अन्नधान्य तुट भरून काढण्याचा प्रयत्न केला. पुढे सिंचन व्यवस्था सुधारली. बी बियाणे खते. आधुनिक शेती औजारे. आधुनिक शेती पध्दती. यामुळे आपण १९७० चया सुमारास आपण अन्नधान्य उत्पादनांची पातळी उंचावली या बदलाला. # हरित क्रांती # असं म्हणलं जातं. देश अन्न धान्य यामध्ये स्वावलंबी बनला.
आज आपले चोचले वाढले. लग्न. जावळ. मुंज. मयताचे कार्यक्रम. वेळोवेळी होणार या पार्ट्या. असे एक नाही अनेक सुखाचे दुःखाचे कार्यक्रम. त्यात आज सर्वात मोठा साजरा केला जाणारा एक अनोखा फंडा म्हणजे वाढदिवस. मग तो लग्नाचा असो. ६० वर्ष पार केली म्हणून होणारे कार्यक्रम. नेत पुढारी आमदार खासदार यांचे सामुदायिक साजरे होणारे वाढदिवस. यामध्ये. मित्र. नातेवाईक. सगेसोयरे. यांना निमंत्रित केले जाते. अशा कार्यक्रमातील जेवन शाकाहारी व मांसाहारी अस असतं. पंचपकवान जेवन असतं. शाकाहारी जेवण असेल तर. जास्त लोक येत नाहीत पण मांसाहारी जेवण असेल तर. मग काय झुंबड पडते. त्यातील काहीजण दारू पिऊन येतात. एकामेकांच्या अंगावर पडून जेवणाची पंगत बसते. मटन याव म्हणून तो भात घेतो. आणि मटण काही येत नाही मग काय घेतलेला भात त्यात एक माणूस जेवल एवढा भात तो मात्र करतो. असा कोणी एक नसतो त्या जेवणाच्या कार्यक्रमात असे बरेच लोक असतांत. मग विचार करा किती अन्न मात्र होत असेल. याच जेवणाच्या वेळी दारात परिस्थितीने गरीब असणारे मुल. लोक यांना आपण हाकलून लावतो. आणि जे जेवण मात्र करतात त्यांना आग्रह करून जेवायला घालतो. आणि सर्व अन्न मात्र करतो. याचाच अर्थ असा होतो की गोरगरीब लोकांच्या तोंडातून आपण घास हिरावून घेतो. आपल्या अशा वागण्यामुळे जगात एकावेळी किती अनेक सुखाचे दुःखाचे कार्यक्रम होत असतील जर प्रत्येक कार्यक्रमात एवढे अन्न मात्र झाल तर आपल्यावर एक वेळ नव्हे तर आत्ताच कुपोषण सारखा प्रसंग आला आहे.
कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकट आले आणि सर्व गावांत तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली लोकांना रस्त्यावर फिरणे बंद झाले सर्व सुखाचे दुःखाचे कार्यक्रम बंद करण्यात आले लोकांच्या एकत्र येण्यावर सुध्दा बंदी घालण्यात आली. मग मला एक सांगा कोरोना मुळे आपणांस अन्नाची किंमत कळली. कुठे कार्यक्रम नाही. हाॅटेल. धाबे. विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानें गाडे सर्व बंद एवढेच काय परगावाहून परराज्यातून आलेले कामगार अडकून पडल्यामुळे उपाशी राहिले मग यांना अन्नाची किंमत कळली ना. म्हणजे आपणास जे काय कळले नाही ते कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आपणांस सांगितले.
आज सर्व काही खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानें गाडे धाबे हाॅटेल. बार. दारु दुकान सर्व काही चालू झाले आहे. सर्व काही सुखाचे दुःखाचे कार्यक्रम सुरू झाले आणि अन्नाची नासाडी पहिली होती तशी चालू झाली. आणि आपणं एकाबाजूला कुपोषण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करतोय आणि एकीकडे रोज हजारो किलो अन्नाची नासाडी करत आहोत विचार करा आणि अन्न जपून वापरा नाही तर. एकदिवस आपल्याला सुध्दा उपाशी राहावे लागेल.
गतकाळात घरातील कार्यक्रमात शेजारी असणार्या महिला. एकामेकाला मदत म्हणून जेवणाची भांडी धुत असत आत्ता कोणीही एकामेकाला मदत करतं नाही. जेवणाचा आचारी. वाडपयासह. सर्व नियोजन बघतो. काही ठिकाणी मी अस बघितले आहे. लोकांच्या ताटात शिल्लक असलेलें अन्न खाऊन काही गरिब लोक आपली पोटाची खळगी भरतात किती वाईट आहे बघा. खाल्ल्यावर पचायसाठी फिरणारे आपण बघितले आहेत. तर काहीजण. पोटात अन्न नाही झोप लागत नाही म्हणून फिरतात ही केवढी शोकांतिका आहे
आजचं निर्णय करा अन्न जेवढ गरज आहे तेवढंच शिजवा. वेळ पडल्यास. अनाथाश्रम. मुकबधीर शाळा. विविध गोरगरीब लोकांच्या झोपड्यांमध्ये जेवण किंवा गहू तांदूळ दान करा. मात्र करण्यापेक्षा कुणाच्यातरी पोटात घाला त्याचा आत्मा तुम्हाला व त्या अन्नाला दुवा देतील. आपल्या जवळ कोणी कुपोषित बालके आहेत का याची माहिती घ्या आणि आपल्यापरीने त्यांना मदत करा. आज तुम्ही करा उद्या दुसरा करेल यामुळे कुपोषणचा पाश सैल होईल त्यापेक्षा कायमचा सुटेल. हे सर्वात मोठे काम आहे विचार करा अंमलबजावणी करा
# कुपोषण #
कुपोषण म्हणजे काय
कुपोषणाचे दुष्परिणाम
कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय
दंडाचा घेर कुपोषणासाठी उपयोगी तपासणी
कुपोषण म्हणजे काय ?
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
# कारणे #
लवकर अंगावरील दुध पाजणे बंद करणे.
बाळाला भरपूर व वेळेवर अंगावरील दुध न मिळणे.
पुरक पोषक आहारास उशीरा सुरवात.
आहारात अ जीवनसत्त्वाचा अभाव.
सतत आजारी पडणे.
दोन मुलांमध्ये कमी अंतर.
लक्षणे
कृश अंगकाठी, वजन कमी, पोटाचा नगारा, हातापायाच्या कड्या, केस पिंगट, उदास व खिन्न चेहरा, वजनात घट ( कधी कधी सुजेमुळे जास्त ) चामडीवर काळे डाग किंवा फोड, पायावर सुज
# लक्षणे #
वजनात फार हळुहळु वाढ
पोटाचा नगारा
कृश अंगकाठी
भूक मंदावणे
निरुत्साही
फिक्कटपणा ( रक्तपांढरी किंवा अनिमिया )
माती खाण्याची इच्छा
ओठांच्या कोपऱ्यात भेगा
नेहमी सर्दी वा तत्सम जंतूजन्य आजार
# आजार #
रातांधळेपणा
गंभीर प्रकार
मुलाच्या वजनात वाढ न होणे
पाय व कधी कधी तोंड सुजने
शरीरावर काळे डाग पडणे
केस गळायला सुरुवात होणे, टक्कल पडणे
नेहमीच्या हसण्या- खेळण्यात रस न घेणे
तोंडात फोड किंवा पटटे येणे
वाढत्या वयोमानानुसार बुद्धीची वाढ न होणे
डोळ्यांतील पांढराभाग खरखरीत होवून नंतर अंधत्व येणे.
कुपोषणाचे दुष्परिणाम
वजन न वाढणे व वाढ न होणे
चालणे, बोलणे व विचारशक्ती या क्रिया मंदावणे.
हातापायाच्या कड्या व पोटाचा नगारा होणे.
चेहऱ्यावर उदासपणा व निरुत्साही वृत्ती
हात, पाय व चेहरा यावर सुज आणि चामडीवर डाग व फोड येणे.
केस विरळ होणे व गळणे आणि केसांचा रंग पिंगट होऊन ते निस्तेज होणे.
अनिमिया होणे
प्रतिकारकशक्ती कमी होणे
जंतुदोषाचे प्रमाण वाढणे
कुपोषित मुलांना गोवरचा जास्त धोका असतो.
टी.बी. व क्षयाचा विकार वाढतो.
अनेक माता आपले मूल आजारी पडले असतांना किंवा त्याला जुलाब होत असतांना सकस आहार देण्याचे थांबवतात. परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडायचा सुद्धा धोका असतो. आजारी मुलांना पोषक आहाराची जास्त गरज असते. तो देण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे.
कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय
बाळाला एक ते दिड वर्षे स्तनपान करणे.
बाळाला पहिल्या दिवशी पासुन वेळेवर दुध पाजणे.
सहा महिन्यांनंतर लगेचच स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराला सुरुवात करावी.
दोन मुलांमधील अंतर कमीत कमी तीन वर्ष असावे.
मुलाचे सर्व लसीकरण वेळेवर करावे.
अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित दयावा.
दंडाचा घेर कुपोषणासाठी उपयोगी तपासणी
एक वर्षावरील मुल चेहऱ्यावरून व हातापायावरून कितीही मोठे दिसत असले तरीही त्याच्या दंडाच्या मध्यभागी मोजपट्टीने घेतलेला घेर १३ सें.मी. च्या खाली जर घेर असेल तर कुपोषण गंभीर प्रकारचे आहे.
अंगावरच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न नसणारी मुले कित्येक वेळा दिसायला गुटगुटीत दिसली तरी सुद्धा ती कुपोषणाच्या सीमारेषेवर असतात. जुलाब, किंवा सर्दीचा एखादा सौम्य आजार देखील त्याला कुपोषित करतो. मुल सशक्त आहे की कुपोषित आहे हे समजून घेण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांचे वजन दर महिन्याला घेणे हा होय.
या फरकामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील माणसाचे आहार वेगवेगळे असतात कष्टकरी यांना # झुणका भाकर # केंद्राचा नाहीतर पुरी भाजी वाले यांचा आश्रय घ्यावा लागतो. तर उच्च भ्रूंसाठी विविध देशी परदेशी अन्नपदार्थ मिळाणारी दुकाने हाॅटेल चालू असतात श्रीमंत आणि गरीब यांच्या आहारात पोषक तत्वे विविधता. या सर्वच बाबतींत खूप अंतर असते. पोषक आहाराचा अभाव हा प्रश्न नुसत्या धान्य उत्पादना पुरता मर्यादित नाही. वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य यांच्यामुळे तो जास्त गुंतागुंतीचा बनतो. म्हणूनच शाळकरी मुलांना न्याहरी किंवा एक वेळच जेवण सकाळचे जेवण स्वस्त किंवा मोफत देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या राज्यात शासन करत असते यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी मोलाचे प्रयत्न शासन करत आहे त्याला सहकार्य करणे आपले परम कर्तव्य आहे.
कुपोषण आणि दारिद्र्य यामुळे आरोग्याची हेळसांड होणे अनेकांच्या साथीचे रोगांना सामोरे जावे लागते. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे योग्य औषध पाणी करण्याचे दुर्लक्ष केले जाते. या सर्वांहून महत्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि औषधें या सुविधा बहुसंख्याना मिळतच नाहीत. खेड्यात डॉ नसणे. लहान दवाखान्यात शस्त्रक्रियेची साधनें नसणे. शहरातील सरकारी दवाखान्यात रोगयाकडे दुर्लक्ष होणे. औषधें कमी प्रतींची असणे. या सर्व गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर वातानुकूलित टोलेजंग खाजगी दवाखाने भरमसाठ फी आकारणारे. निष्णात तज्ज्ञ. श्रीमंतांसाठी उपलब्ध असणार्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा याही गोष्टी आपण पाहतोच सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य रक्षणासाठी सार्वजनिक स्वच्छता किमान वैद्यकीय सेवा आणि स्वस्त औषधें उपलब्ध कशी करून द्यायची हा आपल्यापुढे एक प्रश्न असतो. त्यासाठी जीवरक्षक औषधांच्या किंमतीवर मर्यादा घातल्या जातात. सुविधा ह्या प्रामुख्याने मध्यमवर्गीय. व नोकरदार यांनाच मिळतातं. रोजंदारी वरील कष्टकरी मजूर. गरिब थरातील महिलांना. बालकांना. नोकर दारा प्रमाणे सुविधा मिळत नाहीत शिवाय महिलांच्या आरोग्याची तर जास्त हेळसांड होते. त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी स्वतंत्र आणि प्रभावी अशा यंत्रणा अभाव असतो
समाजसेवा बंद आंदोलन उपोषण मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा