वैभववाडी
मानवी जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये पर्वतांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. पर्वत आणि मानव यांचे अतूट नाते आजही टिकून आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनी संकल्प करून पर्वतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे वैभववाडीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरज पाटील यांनी सांगितले.
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने कोकिसरे- बांधवाडी येथे सालवा डोंगराच्या पायथ्याशी पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री. प्रकाश पाटील, वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, प्रा.सौ.वंदना काकडे, पोलीस श्री. संदीप राठोड, वनरक्षक श्री.एस. एस. कुंभार, सौ.व्ही.बी.जाधव व वनमजुर श्री.टी.बी. ढवण,प्रा. एस. एन. पाटील व विद्यार्थी ओमकार चव्हाण उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.काकडे यांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन याबाबत माहिती दिली.वनपाल श्री.प्रकाश पाटील यांनी वनांचे महत्त्व सांगितले.
आंतरराष्ट्रीय पर्वत दिन व पर्वत पूजन कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे सचिव व इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनी प्रास्ताविकातून मांडले.पर्वत प्रतिज्ञा घेण्यात आली. शेवटी प्रा.सौ.वंदना काकडे यांनी सर्वांचे आभार मांडले.