बांदा दूरक्षेत्रातील आंबोळी जत्रोत्सवात रंगणार जुगाराची मैफिल
बांदा दूरक्षेत्रातील आंबोळी गावात आज होत असलेल्या जत्रोत्सवात रात्री उशिरा जुगाराची मैफिल सजणार असल्याची खात्रीलायक खबर संवाद मीडियाच्या स्थानिक प्रतिनिधीला मिळाली असल्याने संवाद मिडियाच्या स्थानिक वार्ताहर वर दबाव आणण्याचा प्रयत्न संबंधितांकडून होत असल्याचे समोर आले आहे. संवाद मिडीयाच्या वार्ताहर वर दबाव आणताना वार्ताहराच्या नातेवाईकांना पुढे करून जत्रोत्सवात होणाऱ्या जुगाराची खबर न देण्यासाठी आमिषे देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संवाद मिडिया निःपक्षपाती पणे दारू, मटका जुगारासारख्या अवैध धंद्यांची पोलखोल करत आला आहे त्यामुळे अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. संवाद मिडियाची बातमी आल्यावर अनेक जत्रोत्सवात सुरू असणाऱ्या जुगारांच्या बैठका गुंडाळण्याची परिस्थिती स्थानिक खाकी वर्दीवर आलेली आहे. त्यामुळे संवाद मिडियाच्या वार्ताहर, प्रतिनिधीला दबाव आणून कोणीही बातमी झाकून ठेऊ शकत नाही. सूर्य उगवल्यावर झाकलेला कोंबडा आरवण्याचे सोडत नाही, त्याचप्रमाणे गैरधंदे जिथे सुरू असतील त्यांना उघडे करण्याचे काम संवाद मिडिया सातत्याने करत आला आहे आणि करत राहणार आहे.
बांदा जवळील आंबोळी या गावात आजच्या जत्रोत्सवात सुरू होणारे जुगार हे देखील खाकी वर्दीसाठी आव्हान आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र दाभाडे जत्रोत्सवात सुरू असणाऱ्या जुगारांवर नक्कीच टाच आणतील यात शंकाच नाही.