कणकवली
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घर सोडले नाही.मोठ्यात मोठे मंत्री सुद्धा घराबाहेर पडले नाहीत मात्र गावागावात आणि घराघरात आशाताई सेविका पोचल्या.जनतेला सेवा दिली. तुम्ही आमच्यासाठी जेव्हढे करता त्याची परत फेड करता येणार नाही, मात्र अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून शासनाकडून तुमच्या मानधनात भरीव वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.मी तुमचा आमदार म्हणून सातत्याने या सरकारला तुमचे हक्क देण्यास भाग पाडेन असे आश्वासन भाजपा आमदार नितेश राणे यांनी “आशा सेविका दिन” कार्यक्रमात बोलतांना दिले.
कणकवली तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने आयोजित आशा सेविका दीना च्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत,सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गतविकास अधिकारी हजारे, आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, पस सदस्य मिलिंद मेस्त्री, डॉ.वळंजू, डॉ.टिकले, जिल्हा गट प्रवर्तक चिंदरकर आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणले, आजचा दिवस फार महत्वाचा आहे.आशा सेविका दिन हा एकच दिवस नाही तर सर्व दिवसच,वर्षाचे ३६५ दिवस हे आशा सेविकांचे आहेत.खऱ्या अर्थाने सेवा करणारी कोण असेल तर अशा सेविका आहे.
मात्र सरकार त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला देत नाही.काही महिन्यांपूर्वी आशा ताईना मार्गदर्शन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले तेव्हा डायबेटीस होईल असे वाटले.एवढे ते गोड बोलले होते मात्र पुढे काय काहीच झाले नाही.ना मानधन वाढले ना मोबदला मिळाला.तरीही तुम्ही थांबला नाहीत.काम करत राहिला.त्यामुळेच येत्या अधिवेशनात मी तुमच्या साठी आवाज उठविणार असल्याचे आश्वासन यावेळी आम.नितेश राणे यांनी दिले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत म्हणाल्या,कोरोना काळात खऱ्या योद्धा आशा ताई सेविका आहेत.शासकीय मदत जेव्हा कोणीच देत नहोते तेव्हा आमदार नितेश राणे यांनी आशा सेविकांना मदत दिली आणि आशा ताईंच्या प्रोत्साहन दिले.आम्ही यापुढे सुद्धा असेच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी कायम असू असा विश्वास यावेळी जीप अध्यक्ष सौ.सावंत यांनी व्यक्त केला.
सभापती मनोज रावराणे म्हणले, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थी पर्यत पोचविण्याचे काम आशा सेविका करतात.स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात याच सेविकांना काम केले.असे काम करणारी यंत्रणा होती म्हणून आपण तालुक्यात चांगली सेवा देऊ शकलो. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा ताईंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्थाविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ यांनी केले.