You are currently viewing भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांची शिष्टाईनंतर बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतून संदिप बांदेकर यांची माघार

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांची शिष्टाईनंतर बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतून संदिप बांदेकर यांची माघार

बांदा

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतून संदिप बांदेकर यांनी माघार घेतली आहे. भाजपा पक्ष देईल त्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे अभिवचन संदिप बांदेकर यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिले.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, बांदा मंडल प्रभारी प्रमोद कामत, सावंतवाडी नगरसेवक सुधीर आरीवडेकर, भाजपा युवा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, प्रवीण पंडित, दीपक सावंत, साई धारगळकर, मंदार नार्वेकर, अमित परब आदी उपस्थित होते.
बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदिप बांदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी त्यांची समजूत काढून उमेदवारी मागे घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. आगामी निवडणूकीत अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संदिप बांदेकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा