वैभववाडी
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या छाननीत 11 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. तर 39 अर्ज वैध ठरले आहेत. प्रमुख सर्वच पक्षाचे उमेदवार व अपक्ष उमेदवार पाञ ठरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वाभवे- वैभववाडीच्या 13 जागांसाठी 50 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. बुधवारी सकाळी 11 वा.पासून वैभववाडी तहसिल कार्यालयात छाननी पार पडली. सकाळपासूनच उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसिल कार्यालय व परिसरात गर्दी केली होती. भाजप, शिवसेना, काॕग्रेस, राष्ट्रवादी काॕग्रेस, मनसे यांनी भरलेले प्रमुख उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननीसाठी वैभववाडी पोलिस निरीक्षक आतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अपाञ ठरलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग 2 मधून साक्षी संतोष माईणकर ( भाजपा), प्रभाग 6 मधून सुप्रिया राजन तांबे ( भाजपा), प्रभाग 7 मधून सुभाष अनाजी रावराणे ( शिवसेना), समाधान मारुती रावराणे ( भाजपा), प्रभाग 10 मधून सुप्रिया रणजित निकम ( भाजपा), प्रभाग 12 मधून सज्जन विनायक रावराणे ( भाजपा), मनोज दत्ताराम सावंत ( शिवसेना), प्रभाग 13 मधून विशाल विश्राम राणे( शिवसेना ), संतोष दत्ताराम कुडाळकर ( भाजपा), प्रभागा 14 रिया रणजीत तावडे ( शिवसेना), प्रभाग 17 शुभांगी विलास माळकर( शिवसेना) असे एकूण 11 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
प्रभाग क्र.11 मधील उमेदवार यामिनी यशवंत वळवी ( भाजपा)यांच्या नावात बदल असलेबाबत शिवसेनेचे उमेदवार जयश्री बहीरम यांनी आक्षेप घेतला होता. माञ वळवी यांनी नावाबाबत प्रतिज्ञापञ सादर केल्यामुळे बहीरम यांची हरकत निवडणूक अधिकारी यांनी फेटाळली आहे.
तर प्रभाग 13 मधील भाजपचे उमेदवार संजय सावंत यांनी सेनेचे शिवाजी राणे व विशाल राणे यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा असल्याची हरकत घेतली होती. ती ही निवडणूक अधिकारी दादासाहेब गिते यांनी फेटाळली आहे.
फोटो- छाननी वेळी उमेदवार , राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात केलेली गर्दी.