जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे यांचे पत्र
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग व देवगड – जामसंडे या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 करिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. राज्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सदर कार्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलेल्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याचे व त्यानुसार सर्व संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार आवश्यकती कार्यवाही तात्काळ करावी असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे यांनी संबंधित नगरपंचायतींच्या निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज पाठविले आहे.