मालवण
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २० ग्रामपंचायतींपैकी केवळ सात ग्रामपंचायती मधून १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उद्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.
कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आदिती वामन परुळेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण प्रवर्गमधून रुपेश रवींद्रनाथ खोबरेकर, नितीन मंगेश बांदेकर तर प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण प्रवर्गमधून रमेश पांडुरंग कद्रेकर, अपर्णा अरविंद धुरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण प्रवर्गमधून संजना संभाजी आचरेकर, मेघा मनीष पाटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वेरळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये नागरिकांचा मागासप्रवर्गमधून सुहासिनी श्रीधर मांजरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. बिळवस ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण प्रवर्गमधून प्रकाश परशुराम फणसे, गुरुनाथ सुरेंद्र फणसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मर्डे ग्रामपंचायतीच्या प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी सायली साईप्रसाद पेडणेकर, गार्गी गणेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रावण ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण प्रवर्गमधून राजन श्रीधर नाटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कातवड, महान, त्रिंबक, बांदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, किर्लोस, पोईप, पळसंब, रामगड, सुकळवाड, हेदूळ, खोटले, वराड या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. उद्या ता. ७ रोजी छाननी होणार आहे.