You are currently viewing निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत पोलिसांचा रूट मार्च

वैभववाडी

20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या वाभवे – वैभववाडी नगरपंचायत च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी शहरात रूट मार्च केला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व दंगा काबू पथक या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही राजकीय वादंग होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये यासाठी वैभववाडी पोलीस दक्षता घेणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा