महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.
मुख्य परीक्षा दिनांक ७ ते ९ मे २०२२ रोजी होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, अशी माहिती एमपीएससी (MPSC) प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शनिवारी एमपीएससी प्रशासनाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे २०२२ मधील स्पर्धा परीक्षा होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, एमपीएससीने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून परीक्षा होतील, असे स्पष्ट झाले आहे.
- राज्यसेवा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२
- दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२
मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२
पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२
- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२
- महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२
- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२
- राज्यसेवा परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२
मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३
- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३
- महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार
- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३