You are currently viewing मनसेकडून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सुरू…

मनसेकडून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सुरू…

माजी आमदार तथा मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेला होणारा मनःस्ताप कमी करण्यासाठी सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालय समोर आज पासून सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना आपत्ती प्रादुर्भाव चालू झाल्यापासून कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभार बेजबाबदारपणा याच्यामुळे नाहक मनस्ताप होत असल्याबाबत अनेक तक्रारी विविध वृत्तपत्र प्रसारमाध्यम व रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची परवड होत असून त्यांची हेळसांड होत असल्याची धारणा जिल्ह्यातील जनतेची झालेली होती. मनसेच्या माध्यमातून त्यांना धीर देण्याच्या दृष्टीने व या आपत्ती कार्यकाळ प्रादुर्भावित उचित मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मनसेने हा अभिनव उपक्रम चालू केला आहे जिल्ह्यातील जनतेने या आपत्ती कार्यकाळात घाबरून न जाता धैर्याने सामना करण्याच्या दृष्टीने मनसेच्यावतीने सहकार्य करण्यार असल्याची माहिती सरचिटणीस उपरकर यांनी यावेळी दिली. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी सर्वसामान्य जनतेकडे पाठ फिरवल्याचे चित्र असताना मनसे हा एकमेव पक्ष आहे जो या संचारबंदी कार्य काळापासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनतेला मदत करत आहे याचा उल्लेखही आवर्जून केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा