दिल्ली प्रतिनिधी:
देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोना मुळे निधन झाले आहे .ते ६५ वर्षांचे होते. उपचार घेण्यासाठी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ११ सप्टेंबर ला दाखल झाले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशाचे रेल्वे मंत्री सुरेश अंगडी हे कर्नाटकचे दुसरे खासदार होते. ते लोकसभेचे सदस्य होते. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
त्यांचे निधन ही एक दुःखद घटना आहे. मी शोक प्रकट करतो. या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या सोबत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’ अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.
त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला.