मालवण :
पशुसंवर्धन विभाग जि. प. सिंधुदुर्ग च्या वतीने व पेंडूर सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था पेंडूरच्या सहकार्याने, ग्रामपंचायत खरारे पेंडूर येथे दुध उत्पादक शेतकर्यांना मका बी चे मोफत वाटप करण्यात आले.
गावातील दुध उत्पादन वाढावे व दुध उत्पादकांना जनावरांसाठी चांगल्या प्रतीचा ओला चारा उपलब्ध व्हावा यासाठी पेंडूर डेअरीच्या वतीने हा उपक्रम आयोजीत करण्यात आला.
तसेच दुध उत्पादकांना, शेतकर्यांना जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्यांसाठी तसेच कोंबड्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज कसे उपलब्ध होते व किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.सदर मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक व बँक आॅफ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास डाॅ.आर .बी दळवी – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, श्री गोसावी शाखा व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक, श्री मर्गज विकास अधिकारी, श्री कपाडीया शाखा व्यवस्थापक बँक आॅफ महाराष्ट्र, सहा. पशुधन विकास अधिकारी डाॅ.माईणकर व डाॅ. तेली, सौ. सुनिता मोरजकर सरपंच ग्रामपंचायत खरारे पेंडूर, दिपक गावडे अध्यक्ष पेंडूर दुध संस्था, संजय नाईक सचिव पेंडूर दुध संस्था, श्री. सुनिल पालकर अध्यक्ष सुकळवाड दुध संस्था, श्री वासुदेव दळवी अध्यक्ष तळगाव दुध संस्था, सौ. दिपा सावंत, गजानन सावंत, शिवराम सावंत, नितीन सावंत, सत्यवान सावंत तसेच पेंडूर पंचक्रोशीतील दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.वेर्लेकर यांचे मार्गदर्शन व बहुमोल सहकार्य लाभले.