You are currently viewing शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

– सहायक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी

सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी  जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण,कणकवली, व वेंगुर्ला तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे एकूण 08 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  मागासवर्गीय गरजू व वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेंचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज  कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी पासून पुढील वर्ग सुरु झाले असल्याने, मागासवर्गीय मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकृती करण्यात येत आहेत. जिल्हयातील विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाचे अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतीगृहातील गृहपाल व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग 02362 228882 या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा